नक्षलवाद - " शस्त्रा घाता शस्त्रची उत्तर "
धनंजय जुन्नरकर
छत्तीसगढ येथे काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला करून नक्षलवाद्यांनी संपूर्ण देशात खळबळ माजवून टाकली . सलवा जुडूमचे प्रणेते महेंद्र कर्मा ,कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल ,त्यांचा मुलगा दिनेश ,सुरक्षा अधिकारी व इतर कार्यकर्ते अशा 3 0 जणांना गाड्यांच्या बाहेर ओढत- नावे विचारत गोळ्या घालून ठार केले . त्यांच्या प्रेतावर नाचले ,प्रेतांना बंदुकीच्या दस्तांनी ठेचले . काही लोकांचे डोळे काढले ,काहींची अवयवे कापली . राक्षसांनाही लाजवेल असा प्रकार क्रांतीच्या नावाखाली माणसांनीच केला . माणसाचे शरीर धारण करून आलेली होती म्हणून त्यांना आपण माणूस म्हणायचे इतकेच !
नक्षलवादावर कही भाष्य करण्यापूर्वी त्याची संपूर्ण पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे . भांडवलशाही व साम्यवाद अशा दोन विचारधारांवर जगाची विभागणी झाली आहे . रशिया - चीन वगळता साम्यवादाला कोठे थारा मिळाला नाही . साम्यवाद आता जागतिक दर्जाच्या दृष्टीने दखल घेण्या इतकाही उरलेला नाही . खरे तर या दोन्ही तत्वांना राष्ट्रीय विचार धारेचे कोणतेही सोयरेसुतक नाही . संयावादाने रशियाची शकले झाल्यावर ब्रेड च्या तुकड्यासाठी अनेक किलोमीटर च्या रांगा जगाने पहिल्या .1 9 5 9 - 6 1 च्या दुष्काळात चीन मध्ये 4 कोटी लोक भुकेने मरत असताना आज ज्या माओच्या नावाने नक्षलवादी सामान्य लोकांचे गळे चिरत आहे तो माओ सुंदर ललनांसोबत शृंगारात मग्न होता . याच माओ च्या विचारांवर पुढे माओवाद जन्माला आला .
2 5 मे 1 9 6 7 रोजी पश्चिम बंगालच्या " नक्षल बाडी " येथे जमिनीच्या वादातून जमीनदार व शेतकरी यांच्यात तुफान संघर्ष झाला . त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 1 शेतकरी ठार झाले झाले . येथून पुढे जो लढा उभारला गेला त्याला " नक्षलवाद" हे नाव पडले . मार्क्सवादी कमुनिस्ट पक्षापासून वेगळे झालेले चरू मुजुमदार , व कानू सन्याल यांनी या असंतोषाचे नेतृत्व केले . ,भूक कुपोषण , अशिक्षितपणा , बेरोजगारी व कर्ज आदिवासींचे जिणे नरकासम झाले होते . त्यांना स्वतंत्र राज्याची स्वप्ने दाखवून ह्या कथित माओवाद्यांनी एकत्र करायला सुरुवात केली .नक्षलवाद्यांच्या मते त्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला असून ते आत्ता जे करत आहे ती त्यांची प्रतिक्रिया मात्र आहे . जमीनदार , भांडवलदार , पोलीस , राज्यकर्ते हे त्यांचे आद्य शत्रू असून प्रतिक्रियात्मक हिंसा करायचा त्यांचा अधिकार आहे .
काही बुध्दीवंतांच्या मते आणि नक्षलवाद्यांच्या मते नक्षलवाद ही एक विचारधारा आहे .काही ठिकाणी माओवादी इस्लामी दहशवाद्यान सोबत संधान बांधून आहेत तर काही ठिकाणी हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करायला लावणाऱ्या आत्यंतिक कर्मठ ख्रिस्ती धर्मांधां सोबत देखील आहेत . दोन - तीन वर्षांपूर्वी कंधमाल च्या आदिवासी बहुल भागात भागात चार दशकांहून जास्त काळ काम करणाऱ्या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वतींची हत्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी करण्यात आली . न्यायिक चौकशी समितीने गुन्ह्याची उकल केली असता असे आढळले की स्वामींनी त्या भागात गो -हत्या बंदीचा प्रसार केला होता . हिंदूंमध्ये जागृती करून त्यांचे ख्रिस्ती धर्मात जाणे थांबविले होते . ह्या हत्येची जबाबदारी माओवाद्यांनी वृत्तपत्रांना मुलाखती देऊन स्वतःवर घेतली होती . या साठी बरीच मोठी रक्कम घेतली गेली होती . क्रांतीचे दावे करणारे कार्ल मार्क्स च्या विचारांची दुही देतात . मार्क्सने क्रांतीच्या विचारात चर्च हा मोठा अडथळा सांगितला होता . त्यांच्या विचारधारेचे पाईक नक्षलवादी मात्र पैसे घेऊन कोणाचेही कोणतेही काम करायला तयार आहेत .
क्रांतिकारी विचारांनी सुरू झालेले हे आंदोलन एका हत्यारबंद टोळीत रुपांतरीत झालेले आहे . ते इस्लामी दहशतवाद्यांकडून देखील पैसे स्वीकारतात व चर्च कडूनही पैसे स्वीकारतात . ह्यांच्याकडे आता खरा आदिवासी सोडला तर सर्व काही आहे . ल्येपटोप , अत्याधुनिक शस्त्रे , भू सुरुंग ,प्रचंड पैसा आलेला आहे . पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या " बन गेटुडी " या शिबिरावर छापा मारला असता पोलिसांना बंदुका , सुरुंगाचे सामान ह्या सोबत ब्ल्यू - फिल्मच्या सीड्या मिळाल्या . कंडोम , माला -डी , आयुर्वेदिक शक्तीवर्धक गोळ्या सापडल्या . तेव्हा पोलिसांना मिळालेल्या महिती नुसार बऱ्याच नक्षलवाद्यांना एड्स ची लागण झाल्याचे कळाले . कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवरील हल्ल्यात देखील 1 0 0 च्यावर महिला होत्या . या महिलांना मोठी स्वप्ने दाखवून आपल्या चळवळीत सामील करून घेतले जाते . त्यानंतर ह्या महिलांच्या यौन शोषणाला प्रारंभ होतो . यांच्यात कुमारी मातांचे प्रमाण प्रचंड आहे . ह्यातून जन्मलेल्यांना पुन्हा नक्षलवादाचे ट्रेनिंग दिले जाते . अशा प्रकारे ते आपली संख्या वाढविण्यात यशस्वी होत आहेत . कुमारी मातांना पुन्हा आपल्या घरी परतू दिले जात नाही .
नक्षलवाद्यांच्या त्रासामुळे आदिवासी समाज भयभीत झाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी " सलवा जुडूम " ची कल्पना पुढे आली . के . मधुकर राव ह्यांच्या आवाहना नंतर छत्तीसगढ च्या विजापूर जिल्ह्यातील कुतरू गावात 4 जून 2 0 0 5 रोजी स्वयंस्फुर्तीने नक्षलवाद विरोधी लोक जमले . त्यांना शासनाकडे नेण्याचे मोठे काम महेंद्र कर्मा यांनी केले. पोलिसांनी देखील ह्या ला पाठींबा दिला . विस्थापित झालेल्या आदिवासींना एकत्र करण्यासाठी मोठमोठे कॅम्प लावण्यात आले . आदिवासींच्या पुनर्वसनासाठी त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात आली . या कॅम्प मध्ये एक रुपयात अन्न-धान्य ,घर बांधण्यासाठी 3 5 0 0 0 रुपये , मोफत आरोग्य, शिक्षण सुविधा देण्यात आल्या . आदिवासींना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले . विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्यांना मासिक 3 0 0 0 रुपये पगार चालू करण्यात आला . ह्या सर्व बाबींचा दुरुपयोग होऊन पुढे हे आदिवासी खंडणीखोर बनले . त्यांना विरोध करणाऱ्यांना गोळ्या घालू लागले . त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 5 जुलै 2 0 1 1 ला ही योजना बंद करण्याचे आदेश दिले .
एकूण सर्व बाबींची सखोल मीमांसा केली असता नक्षलवाद संपूर्ण शक्तीनिशी चिरडून टाकण्या शिवाय गत्यंतर नाही . ह्यांचे समाजाशी - मानव जातीशी काही देणे घेणे नाही . निरपराधांचे शांतीने जगणे हिरावण्याचा नक्षलवाद्या ंना काय अधिकार आहे ? भारतात राहून देशाची घटना न मानणे ह्या बाबींना राष्ट्र द्रोह शिवाय कोणती उपमा आहे ?भारताचे माजी गृह सचिव जी . के . पिल्लई यांनी 6 मार्च 2 0 1 0 रोजी संरक्षण विषयी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले की नक्षलवाद्यांच्या योजने नुसार 2 0 5 0 मध्ये त्यांना भारतीय राज्य घटना उखडून टाकायची आहे . लाल किल्ल्यावर त्यांचा लाल झेंडा फडकवायचा आहे . नकाशालवाद्यांच्या सिद्धांता नुसार सत्ता " बंदुकीच्या नळीतून येते ". त्यांना भारतीय लोकशाही मंजूर नाही . त्यांना हुकुमशाही राबवायची आहे . ह्या बाबी पहिल्या असता नकाशालवाद्यांचा सामाजिक क्रांतीशी दुरान्वयेही संबंध उरला नसल्याचे प्रकर्षाने जाणवते .
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र पूर्व काळात ज्या उपमा दिल्या त्या आजही तंतोतंत जुळतात . ते म्हणायचे आपल्याकडे विद्वत्ता आहे -विवेक आहे पण तेज नाही . तेज सापडते ते आडाणी माणसात व रामोश्यात . आपल्या शिक्षणात मोठा दोष आहे . आजचे शिक्षण धाडस - स्वतंत्र बाणा - स्वाभिमान शिकवत नाही ही बाब आजही लागू पडते .बुद्धीजीवी व सुशिक्षित राज्यकर्ते कठोर भूमिका घ्यायला धजावत नाहीत .बंदुकीच्या गोळ्या आणि भु- सुरुंगांनी रक्ताचे पाट वाहत असताना समाजातील सुशिक्षित वर्ग कायम शरणागता च्या भावनेने शांती वार्ता- व संवादावर भर देत असतो .कृष्णाचा " शस्त्रा घाता शस्त्रची उत्तर " ते विसरतात . कृष्णाचा पराक्रम ते विसरतात . त्यांना कृष्णाचे फक्त एकच नाव आठवते ते म्हणजे " रणछोड्दास "!
त्यामुळे नक्षलवाद्यांचे फावते आहे , आणि काळ सोकावतो आहे !
No comments:
Post a Comment